Ranveer Singh : ‘देवा श्री गणेशा’ गाण्यावर रणवीर सिंहचा एनर्जीटिक डान्स; व्हिडीओ पाहा…

Ranveer Singh : बॅालिवूडमधील स्वीट कपल म्हणून अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन यांच्याकडे पाहिले जाते. या दोघांचाही चाहतावर्ग खूप मोठा आहे. दोघांनीही अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांच्या घरात एका गोंडस परीने जन्म घेतला आहे.
लेकीच्या आगमनानंतर दोघेही खूप कमी वेळा कार्यक्रमांमध्ये दिसतात. नुकतेच दोघांनीही अंबानी कुटुंबाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रणवीर त्याच्या फुल अॅान एनर्जीसह श्री गणेशा गाण्यावर डान्स करताना दिसला. त्याचा हा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सध्या रणवीर त्याच्या धुरंधर नावाच्या सिनेमामुळे चर्चित आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने सर्वांच्या लक्ष वेधून घेतलं आहे. या सिनेमातील रणवीर सिंहचा लूकला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. रणवीर सिंहचा ‘देवा श्री गणेशा’ गाण्यावर फुल एनर्जीसह नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याच्या डान्सिंग स्ट्राइलने सर्वांना वेड केलं आहे. पल्लव पलिवाल यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर रणवीरचा डान्स करताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
रणवीरच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही अनेक कमेंट्स केल्या आहेत. रणवीरचे धमाकेदार डान्स मूव्ह्ज आणि त्याचं कौशल्य याचं सर्वांनी कौतुक केलं आहे. लवकरच रणवीर त्याच्या आगमी धुरंधर नावाच्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ५ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात आर माधवन, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा : “त्या माकडांमुळे आंदोलनाला…” ; CSMT स्थानकावरील हुल्लडबाजांवर जरांगे संतापले, सरकारवर केले गंभीर आरोप





