Milind Deora : मराठा समाजाच्या आंदोलनानंतर शिंदेंच्या या खासदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली मोठी मागणी, नवा वाद होण्याची शक्यता

Milind Deora : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेलं आंदोलन संपलं आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगेंनी विजयाचा गुलाल उधळला. त्यानंतर मुंंबईत आलेल्या मराठा आंदोलक पुन्हा आपल्या घरी परतले आहेत. मुंबईतील परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे. अशातच शिंदेसेनेच्या एका खासदाराने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक महत्वाचं पत्र लिहिलं आहे. त्यांनी या पत्रातून मोठी मागणी केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.
हे पत्र बुधवारी मुख्यमंत्र्यांना लिहिल्याचे दिसते. देवरा यांनी दक्षिण मुंबईतील कोणत्याही ठिकाणी आंदोलनांना परवानगी देऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रातून केली आहे. मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचा आरोप केला जात आहे.
अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा हाच खरा चेहरा आहे. मुंबईत मराठी माणूस त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी एकवटला, याची पोटदुखी उघड झाली आहे, अशी टीका या पत्रातून उबाठाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे.
शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत मराठी माणसाच्या आंदोलनास परवानगी देऊ नये, असे मुख्यमंत्र्याना पत्राद्वारे लिहिले असल्याचं राऊत म्हणाले आहेत. मिलिंद देवरा यांनी पत्रातून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी सातत्याने होणारी आंदोलने आणि गर्दीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
In light of the recent protests that brought #Mumbai to a near standstill, I’ve written to CM @Dev_Fadnavis ji.
While every Indian has the right to protest, SOPs must ensure that #Maharashtra’s political & economic nerve centre is not paralysed.@mieknathshinde pic.twitter.com/YPbVxEvzcE
— Milind Deora | मिलिंद देवरा (@milinddeora) September 4, 2025
आंदोलनामुळे प्रशासन, सुरक्षा अर्थव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या आंदोलनांना जगातील कोणत्याही राजधानीच्या शहरात परवानगी दिली जात नाही. शांततापूर्ण आंदोलने ही लोकशाहीची महत्वाची असली त्यांचा ठिकाणांचा विचार करायला हवा, अशी भूमिका देवरा यांनी या पत्रातून मांडली आहे.





