K. Annamalai : के. अण्णामलाईंकडून ‘वी द लीडर्स’ आंदोलनाची घोषणा; जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद
तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई (K. Annamalai) यांनी अखेर भाजपचा अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी वी द लीडर्स नावाच्या नव्या राजकीय आंदोलनाची घोषणा केली आहे.

K. Annamalai : तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई (K. Annamalai) यांनी अखेर भाजपचा अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी वी द लीडर्स नावाच्या नव्या राजकीय आंदोलनाची घोषणा केली आहे.
या आंदोलनाला सुरुवातीच्या काही तासांतच जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, अवघ्या १० तासांत १० लाखांहून अधिक लोकांनी या चळवळीत नोंदणी केली आहे. अण्णामलाई (K. Annamalai) यांनी या आंदोलनाला आपल्या नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात म्हटले असून, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास आणि तरुण नेतृत्वासाठी उत्सुक असलेल्या नागरिकांना यात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
अण्णामलाई (K. Annamalai) यांनी आपल्या नव्या पक्षाचे उद्दिष्ट सर्वसामान्यांचे राजकारण असे सांगितले आहे. या नव्या पक्षाच्या घोषणेमुळे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.अण्णामलाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या नव्या पक्षाच्या अधिकृत वेबसाइटची लिंक शेअर केली आहे. आमच्या राजकीय आंदोलनाने एक मोठा टप्पा गाठला आहे.
अवघ्या १० तासांत १० लाखांहून अधिक नेत्यांनी नोंदणी केली आहे. हा विलक्षण प्रतिसाद आमच्या सामायिक दृष्टिकोनावरील आणि सामूहिक मिशनवरील वाढत्या विश्वासाचा भक्कम पुरावा आहे. या आंदोलनावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो. चला पुढे जाऊया, पाऊल उचलूया आणि बदल घडवूया असे त्यांनी म्हटले आहे.
के. अण्णामलाई (K. Annamalai) हे भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी आहेत. पोलीस दलातील धडाकेबाज कामगिरीसाठी ते ओळखले जायचे. मात्र, देशसेवा आणि राजकारणासाठी त्यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला व ते भाजपमध्ये सामील झाले होते. अल्पावधीतच त्यांच्याकडे तामिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.
लहानपणी त्यांच्या पालकांनी त्यांचे नाव शिवा सेंथिल कुमार असे ठेवले होते. नंतर त्यांचे पूर्ण नाव अण्णामलाई शिवा सेंथिल कुमार झाले. मात्र, हे नाव दहावीच्या शालेय प्रमाणपत्रासाठी खूप मोठे होते. दहावीत असताना जेव्हा त्यांना नाव निवडण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी अण्णामलाई हे छोटे नाव निवडले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, अण्णामलाई म्हणजे भगवान शिवाचे रौद्र रूप.






