शिंदेंना मोठा दिलासा ! एकमेकांवर कुरघोडी करणारे ‘हे’ दोन नेते आले एकत्र

वाशीम : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. कधी जवळचे मित्र एकमेकांचे विरोधक होतात तर कधी एकमेकांचे कट्टर विरोधात एकमेकांचे मित्र होतात. राजकारणात काहीपण होऊ शकते. याचा प्रत्यय वाशीम जिल्ह्यात पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद मिटला आहे. एकमेकांवर कुरघोडी करणारे दोन दिग्गन नेते एकत्र आपले वैर बाजूला ठेवून एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे.
‘हे’ दोन नेते आले एकत्र
वाशिममध्ये आमदार भावना गवळी आणि पालकमंत्री संजय राठोड पुन्हा एकत्र आले असल्याचं दिसून आलंय.. दोघांमधील मतभेद बाजूला ठेऊन दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळालं. भावना गवळी आणि राठोड यांची अनेक दिवसांपासून श्रेयवादामूळ राजकारणात कुरघोडी पाहायला मिळत होती. यावर राठोडांना विचारले असता आमच्यात कुठलेही मतभेद नसल्याचं म्हटलंय. हे दोन नेते एकत्र आल्याने मुख्यमंत्री शिंदेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी वाशिम यवतमाळ शहरामध्ये लावलेल्या दोघांमध्ये बॅनरवार देखील पाहायला मिळाल असून दोघांमध्ये प्रचंड एकमेकांविरुद्ध नाराजीचा सूरही उमटत होता. मात्र, आज वाशिम मध्ये पालकमंत्री संजय राठोड वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता नियोजन भवन येथे भावना गवळी व संजय राठोड यांची दिलखुलास चर्चा झाली.





