‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका सोडण्यावर जेठालाल म्हणाले….

मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड
आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील मुख्य पात्र म्हणजेच, जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते ‘दिलीप जोशी’ ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा समोर येत आहेत.
View this post on Instagram
मात्र, नुकतंच दिलीप जोशी यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान दिलीप जोशी यांनी आपले मत व्यक्त केलं.
नक्की काय म्हणाले दिलीप जोशी –
“गेल्या अनेक वर्षांपासून मी या मालिकेचा एक भाग आहे. त्यामुळे जोपर्यंत मी त्या मालिकेचा आनंद घेत आहे तोपर्यंत मी ती मालिका करत राहिन. ज्या दिवशी मला वाटेल की मला आता या मालिकेत आनंद येत नाही, तेव्हा मी याबाबत पुढचा विचार करेन.” असं दिलीप जोशी यावेळी म्हणाले.





