मुंबई – सध्या सर्वत्र ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटाचा बोलबाला आहे. या सौंदर्यवतीने सर्वांवर जादू केली असून, अनेक जण तिच्या प्रेमात पडले आहेत. आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी चंद्रा आणि ध्येयधुरंदर राजकारणी दौलत देशमाने यांची ही अनोखी प्रेमकहाणी कधी एकदा रिलीज होते. असा प्रश्न सिनेरसिकांना पडला आहे.
सध्या सगळीकडूनच ‘चंद्रा’वर प्रेमाचा वर्षाव होत असून, चित्रपटाचं तोंड भरून कौतुक केलं आज आहे. प्रेक्षक नाहीत तर आता, सेलिब्रिटीही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री ‘प्रियांका चोप्रा’ हिने देखील ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचं कौतुक केलं होत.
आता तर, बॉलिवूडची धकधक गर्ल सुद्धा ‘चंद्रमुखी’च्या प्रेमात पडली आहे. होय… अभिनेत्री ‘माधुरी दीक्षित’ हिने आपल्या इंस्टाग्रामवर ‘चंद्रमुखी’चं पोस्टर शेअर करत म्हटलंय की, ‘किती अप्रतिम ट्रेलर आहे… मी नक्कीच चंद्रमुखी चित्रपट पाहणार.’ सध्या माधुरीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायमच सक्रीय असून ती कायमच तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
‘पानिपत’, ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक ‘विश्वास पाटील’ यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी केली आहे.