पूजा खेडकरनंतर आणखी एका बनावट IAS अधिकारीचा प्रताप आला समोर

पुणे : वादग्रस्त आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असताना आता आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा कारनामा समोर आला आहे. रेणुका ईश्वर करनुरे असे बनावट आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पुण्यातील वडकी परिसरात राहणाऱ्या रेणुका ईश्वर करनुरे या महिला आयएएस अधिकारीने परिसरातील अनेक महिलांना व्याजाने पैसे दिले. रेणुका दरमहा दहा रुपये टक्क्याने पैसे उकळत आहे. या प्रकरणी रेणुका विरोधात एका 31 वर्षे महिलेने लोणी काळभोर पोलिसात अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे. 31 वर्षे पीडित महिलेला बनावट आयएस अधिकारी रेणुका हिने दोन लाख 68 हजार रुपये व्याजाने दिले होते. या बदल्यात पीडित ने रेणुका यांना आतापर्यंत तीन लाख 48 हजार रुपये पर्यंत दिले असताना सुद्धा बनावट आयएस अधिकारी रेणुका हिने आणखीन चार लाख 55 हजार रुपयाची मागणी करत त्रास देत धमकावत असल्याचा आरोप तक्रार करणाऱ्या महिलेने केला आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हंटले कि मी आय एस अधिकारी आहे माझ्या नादीला लागू नको तुला कामाला लावेल, माझे पैसे तू ताबडतोब दे म्हणत धमकवण्यास सुरुवात केली. अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता बनावटा आयएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता रेणुका यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांचे अनेक कारनामे समोर येण्याची शक्यता आहे.





