AFG vs HK : सेदिकुल्लाह अटलचा आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात मोठा धमाका! पहिल्यांदाच केला ‘हा’ खास पराक्रम

Asia Cup 2025 AFG vs HK Match Updates : आशिया कप 2025 चा थरार अफगानिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने सुरू झाला. अफगानिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सलामीवीर सेदिकुल्लाह अटलने संघासाठी अत्यंत फायदेशीर ठरवला. अटलने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत कधीही न केलेली कामगिरी या सामन्यात करून दाखवली आणि आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात आपली आक्रमकता दाखवली.
अफगानिस्तानच्या सुरुवातीच्या विकेट्स गेल्या लवकर –
अफगानिस्तानला सुरुवातीला धक्के बसले, जेव्हा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज अवघ्या 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला इब्राहिम झाद्ररनही केवळ एक धाव काढून पॅव्हिलियनमध्ये परतला. मात्र, या संकटकाळात सेदिकुल्लाह अटलने एक बाजू सांभाळली आणि शानदार अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरे अर्धशतक आहे, परंतु यावेळी त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली.
अटलने साकारली कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी –
Sedikullah Atal shines! 🌟
A brilliant half-century against Pakistan 🏏#PAKvAFG #sediqullahatal #IbrahimZadran #cricket pic.twitter.com/Iysn0GCixN
— CricInformer (@CricInformer) September 2, 2025
सेदिकुल्लाह अटलने यापूर्वी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 64 धावांची खेळी केली होती. मात्र, हाँगकाँगविरुद्धच्या या सामन्यात त्याने त्याहीपेक्षा जास्त धावा केल्या. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी आणि केवळ 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या अटलच्या नावावर आता 250 हून अधिक धावा जमा झाल्या आहेत.
चार सामन्यांत तिसरे अर्धशतक –
नुकत्याच झालेल्या अफगानिस्तान, पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील तिरंगी मालिकेतही सेदिकुल्लाह अटलने अप्रतिम फलंदाजी केली होती. त्याने त्या मालिकेत पाकिस्तान आणि युएईविरुद्ध अर्धशतके झळकावली होती. याचा अर्थ, गेल्या चार सामन्यांत त्याने तीन अर्धशतके ठोकली आहेत. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आगामी सामन्यांत तो आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
हेही वाचा – Asia Cup 2025 : हाँगकाँगच्या गोलंदाजाने पहिल्याच सामन्यात रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथाच खेळाडू
अफगानिस्तानने उभारला धावांचा डोंगर –
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, अफगानिस्तानने 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर सेदिकुल्लाह अटल शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 52 चेंडूंचा सामना करत 73 धावा केल्या, ज्यात 3 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. दुसरीकडे, अजमतुल्ला उमरजईनेही आक्रमक खेळी करत केवळ 21 चेंडूंवर 53 धावांची खणखणीत खेळी केली. यामुळे अफगानिस्तानला हाँगकाँगसमोर मजबूत आव्हान ठेवता आले.





