पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. हेमंत झंजाड यांची निवड

पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड हेमंत झंजाड यांची निवड झाली आहे. २०२५-२६ या वर्षासाठी दुहेरी झालेल्या लढतीत तब्बल ३ हजार ३२९ मते मिळवत माजी उपाध्यक्ष असलेल्या झंजाड यांनी एकतर्फी विजय मिळविला.
शुक्रवारी (दि. ३१) मतदान झाले होते. त्यावेळी १० हजार २९९ पैकी ५ हजार १७६ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मध्यरात्री मतमोजणी संपल्यानंतर निकाल घोषित करण्यात आला. मागील वेळी निसटता पराभव स्विकारलेल्या अॅड. समीर भुंडे यांनी यावेळी सर्वाधिक मते खेचून उपाध्यक्ष पदी एकतर्फी विजय मिळविला. त्यांना ३ हजार ३३३ मते मिळाली. तर अॅड. सुरेखा भोसले यांनी १९१९ मते मिळवित विजय मिळविला. त्यांनी यापूर्वी बारचे सचिव म्हणून काम केले आहे. सचिव पदाच्याही दोन जागा होत्या.
यामध्ये अॅड. पृथ्वीराज थोरात याणि अॅड. भाग्यश्री गुजर-मुळे यांनी अनुक्रमे ३ हजार १७४ आणि ३ हजार १५६ मते मिळवित मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळविला. तर खजिनदार पदी अॅड. इंद्रजित भोईटे विजयी झाले. तर ऑडीटर पदी अॅड. केदार शितोळे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.
दहा कार्यकारिणी सदस्यांची सर्वानुमते निवड झाली आहे. त्यामध्ये, अॅड. मावाणी पुनम, अॅड. पवार माधवी, अॅड. नेवाळे भारती, अॅड. पवार प्रशांत, अॅड. श्रीकांत चोंधे, अॅड. प्रसाद निगडे, अॅड. स्वप्नील जोशी, अॅड. आकाश गलांडे, अॅड. राज खैरे आणि अॅड. गणेश माने यांचा समावेश आहे.
निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. गिरीश शेडगे आणि अॅड. विजयराज दरेकर यांनी काम पाहिले. तर अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. अमोल जाधव, अॅड. अनिल ऊर्फ अण्णासाहेब पवार, उप निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.प्रविण येसादे, ॲड. सुप्रिया कोठारी, अॅड.सचिन झालटे पाटील, अॅड.अतुल पाटील, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.संदेश जायभाय, अॅड.प्रभाकर सोनावणे, अॅड.रामचंद्र चांदारे, अॅड.विकास उंद्रे, अॅड.हेमंत भांड, अॅड.कादंबरी दौंडे आणि अॅड.सचिनकुमार गेलडा यांनी काम पाहिले.




