Pune Bar Association : पुणे बार असोसिएशनच्या खजिनदारपदी ॲड. अंजली बांदल यांचा विजय

Pune Bar Association : पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत खजिनदारपदासाठी करडे गावच्या ॲड अंजली बांदल यांनी सर्वाधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या अशोका हॉलमध्ये बुधवारी (दि ४) फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तर गुरुवारी (दि ५) फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेपर्यंत मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला.
या अत्यंत चुरशीच्या आणि लक्षवेधी निवडणुकीत ॲड अंजली बांदल यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत तब्बल ५,२७४ मते मिळवली. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा ३,२३९ मतांचे मोठे मताधिक्य मिळवत त्यांनी खजिनदारपदी निर्विवाद विजय संपादन केला. पुणे बार असोसिएशनच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्यांपैकी हा एक विजय मानला जात असून, त्यांच्या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. Pune Bar Association
या निकालातून वकिल बांधवांनी ॲड बांदल यांच्या कार्यशैलीवर, पारदर्शकतेवर आणि नेतृत्वक्षमतेवर ठाम विश्वास व्यक्त केला असल्याची चर्चा बार असोसिएशनमध्ये होत आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने वकिलांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे लोकशाही प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ॲड बांदल यांच्या या विजयामुळे बार असोसिएशनच्या आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता आणि शिस्तबद्ध कारभाराला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा वकिल वर्गातून व्यक्त केली जात आहे.
“पुणे बार असोसिएशनच्या खजिनदारपदी मला सर्वाधिक मताधिक्याने विजयी केल्याबद्दल सर्व वकील बांधवांचे मनःपूर्वक आभार. ही निवड माझ्या कामावर आणि पारदर्शक कारभारावर दाखवलेला विश्वास आहे. खजिनदार म्हणून संघटनेचा आर्थिक कारभार अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सदस्यांच्या हिताचा ठेवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या निवडणुकीत मला मोलाची साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे, ज्येष्ठ वकील मंडळींचे आणि मित्रपरिवाराचे विशेष आभार. पुणे बार असोसिएशनच्या सर्वांगीण विकासासाठी मी नव्या कार्यकारिणीसोबत समन्वयाने काम करणार आहे.” – ॲड अंजली बांदल (खजिनदार) पुणे बार असोसिएशन
हेही वाचा:
Bike Taxi Services : रिक्षा आणि कॅबने उद्या प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा…




