Adivasi Kranti Sena : धुळ्यात आदिवासी क्रांती सेनेचे आमरण उपोषण; उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल
Adivasi Kranti Sena : आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आंदोलकांची मागणी

Adivasi Kranti Sena : पुणे आणि नाशिक येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात आदिवासी क्रांती सेनेच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
आज उपोषणादरम्यान एका उपोषणकर्त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. (Adivasi Kranti Sena)
जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणातील कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. (Adivasi Kranti Sena)
यासोबतच आश्रमशाळांमधील सेंट्रल किचन पद्धत बंद करावी, विद्यार्थ्यांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि आश्रमशाळांमध्ये सुरक्षारक्षकांची नियुक्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. (Adivasi Kranti Sena)
दरम्यान, आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. लक्ष्मण पवार, सुनील ठाकरे, अनिल सोनवणे आणि संजय मोरे हे आमरण उपोषणाला बसले असून, प्रशासनाने मागण्यांची दखल घेऊन ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
हेही वाचा:






