अदिती द्रविडचा थाटामाटात पार पडला साखरपुडा; शेअर केले सुंदर फोटो

Aditi Dravid Engagement Photos | अभिनेत्री अदिती द्रविडने गुढी पाडव्यानिमित्त चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अदितीने नव्या वर्षाची सुरुवात आयुष्यातील नव्या प्रवासाने केली आहे. नुकताच आदितीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे. अदितीने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. ज्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अदितीने इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘अदिती झाली मोहित’ (#AditiZaliMohit) हा हॅशटॅग दिला आहे. या फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत. साखरपुड्यासाठी अदितीने लेहेंगा परिधान केला होता. तर तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
साखरपुड्याच्या फोटोंवर चाहत्यांसह सध्या संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. याशिवाय, अदितीने होणाऱ्या नवऱ्यासह पारंपरिक लूकमध्येही सुंदर फोटोशूट केलं आहे. या लूकसाठी तिनं लाल रंगाची साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने असा लूक केला होता.
View this post on Instagram
अदितीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव मोहित आहे. मोहित लिमये असं त्याचं नाव असून इन्स्टाग्रामवरील बायोनुसार तो ट्रॅव्हल कंपनीशी संबंधित काम करतो. साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नाबद्दल आता चाहत्यांच्याही मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. Aditi Dravid Engagement Photos |
View this post on Instagram
अदिती द्रविडबद्दल सांगायचे झाले तर, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील भूमिकेतून ती घराघरात पोहचली. तर ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील ‘मंगळागौर’ गाणं अदितीने स्वत: लिहिलं होतं. हे गाणं लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रने गायलं आहे. त्यामुळे तिचे कौतुकही करण्यात आले. राहुल द्रविड अदितीचा चुलत काका आहे. तिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्येही काम केले आहे. Aditi Dravid Engagement Photos |
हेही वाचा:
‘मी गुढी-बिढी काही उभारत नाही’; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?





