अदिती द्रविड करणार कमबॅक; नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Aditi Dravid | अभिनेत्री अदिती द्रविडने मालिका, चित्रपटांसह नाटकांमध्ये देखील काम केले आहे. मात्र मागील काही काळापासून ती छोट्या पडद्यावर फारशी सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले नाही. परंतु आता ब्रेकनंतर ती पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. नुकतेच आदितीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे. तिला पुन्हा एकदा काम करताना पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे आदितीला मोठी लोकप्रियता मिळाली होती. यातील तिच्या लहानश्या भूमिकेने देखील स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. आता मोठ्या ब्रेकनंतर अदितीने स्टार प्रवाह वाहिनीवर कमबॅक केलं आहे. एका नव्या भूमिकेतून आदिती चाहत्यांच्या भेटीस आली आहे. लोकप्रिय अबोली मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शितल सरपोतदार असे तिच्या पात्राचे नाव असणार आहे. Aditi Dravid |
View this post on Instagram
अदिती द्रविडबद्दल सांगायचे झाले तर, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील भूमिकेतून ती घराघरात पोहचली. तर ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमातील ‘मंगळागौर’ गाणं अदितीने स्वत: लिहिलं होतं. हे गाणं लोकप्रिय गायिका सावनी रविंद्रने गायलं आहे. त्यामुळे तिचे कौतुकही करण्यात आले. तिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमध्येही काम केले आहे. Aditi Dravid |
हेही वाचा:
“कारगिल दरम्यानही आपण पाकशी हस्तांदोलन…” ; हस्तांदोलन वादावर थरूर यांचा टीम इंडियाला सल्ला





