Aamir Khan : आमिर खानने वयाच्या 60व्या वर्षी गर्लफ्रेंडसोबत उरकला गुपचुप साखरपुडा? सत्य आलं समोर
Aamir Khan : व्हायरल व्हिडीओत गौरीच्या बोटात रत्नजडित अंगठी दिसत असल्याने आमिरने गौरीसोबत साखरपुड्या केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने वयाच्या 60 व्या वर्षी गुपचुप गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हिच्यासोबत साखरपुडा उरकला असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खान आता गौरी स्प्रॅट हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
अनेक कार्यक्रमांमध्येही आमिर आणि गौरी एकत्र दिसतात. सध्या गौरी आणि आमिरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आमिर आणि गौरी दोघांच्याही हातात अंगठ्या दिसत आहेत. गौरीच्या बोटातील अंगठीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या अंगठ्यांमुळे दोघांनी गपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच आमिरने गौरीसह एका बिजनेसमॅनच्या मुलाच्या लग्नाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आमिर आणि गौरीने पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या.
त्यावेळचा त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गौरीच्या बोटात रत्नजडित अंगठी दिसत आहे. ती अंगठी पाहून आमिरने गौरीसोबत साखरपुड्या केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. Aamir Khan
नेमकं सत्य काय?
याआधीच आमिरने त्याचा लग्नाचा कोणताही प्लॅन नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मनात गौरीसोबत आधीच लग्न केल्याचंही तो म्हणाला होता. वस्तुस्थिती अशी आहे की, आमिरनं नुकत्याच गौरीसाठी दोन अत्यंत खास आणि दुर्मिळ रत्नांच्या अंगठ्या बनवून घेतल्या आहेत. या अंगठ्या जगातील काही सर्वात अनन्यसाधारण आणि मौल्यवान रत्नांचा वापर करून घडवण्यात आल्या असल्याची माहिती मिळते.
या दोन्ही अंगठ्या ‘QWEEN’ या लक्झरी दागिन्यांच्या ब्रँडकडून बनवून घेण्यात आल्या आहेत. मात्र या ब्रँडचे अधिकृत लाँचिंग अद्याप झालेले नाही. गौरीच्या बोटात दिसणारी अंगठीही यापैकीच एक आहे. त्यामुळे त्यांनी साखरपुडा केलेला नाही हे स्पष्ट झालं आहे. Aamir Khan
हेही वाचा:






