अतिरिक्त आयुक्त करणार तुळशीबाग, मंडई परिसराची पाहणी
Updated On:

पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे नियम कडकपणे पाळून तुळशीबाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासह मंडईही सुरू करण्याचे “प्लॅनिंग’ असून, तत्पूर्वी अतिरिक्त आयुक्त दोन्ही भागांची पाहणी करणार आहेत. सोमवार किंवा मंगळवारपासून दोन्ही ठिकाणे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.
शनिवारी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी तुळशीबागेसह महात्मा फुले भाजी मंडई देखील सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल आणि इतर अधिकारी दोन्ही ठिकाणांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत.



