Sara Khan | अभिनेत्री सारा खान ५ डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकली आहे. तिने ४ वर्षांनी लहान असलेल्या क्रिश पाठकसोबत विवाह केला आहे. या लग्नात राजीव ठाकूर, नगमा आणि आवेज दरबार, सृष्टी रोडे, फलक नाज, किंशुक महाजन, जैद दरबार आणि गौहर खान या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मात्र ‘रामायण’ फेम क्रिशचे वडील सुनील लहरी लग्नाला उपस्थित नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. परंतु क्रिश ९ महिन्यांचा असतानाच त्याचे आई-वडील वेगळे झाले होते. सारा आणि क्रिश पाठक यांनी ६ ऑक्टोबर रोजी कोर्ट मॅरेज केलं होतं. ८ ऑक्टोबरला दोघांनी फोटो पोस्ट करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. या दोघांची ओळख डेटिंग अॅपवरुन झाली होती. एक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी आधी कोर्ट मॅरेज केलं. तर आता ५ डिसेंबरला सातफेरे घेतले. लग्नात साराने लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. डोक्यावर सुंदर घुंगट घेतला होता. ती अक्षरश: दागिन्यांनी मढलेली दिसत होती इतक्या प्रकारचे दाग दागिने तिने परिधान केलेले दिसत आहेत. तर क्रिश पाठकने हिरव्या रंगाची सुंदर शेरवानी घातली होती. त्यावर प्रिंटेड जॅकेटही होतं. सध्या दोघांवर शुभेच्छांचा देखील वर्षाव केला जात आहे. दरम्यान, सारा खानला ‘बिदाई’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. 2010 मध्ये तिने अभिनेता अली मर्चंटशी ‘बिग बॉस’च्या घरात लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या अवघ्या वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर आता तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. हेही वाचा: lifestyle: चहा करताना फक्त ‘ही’ एक सवय लावा; पचन सुधारेल, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोकाही कमी होईल!