सारा खान आंतरधर्मीय लग्नामुळे ट्रोल; व्हिडिओ शेअर करत दिले सडेतोड उत्तर

Sara Khan Trolled | अभिनेत्री सारा खानला ‘बिदाई’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सारा खान दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे.
तिने ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांचा मुलगा क्रिश पाठकशी नोंदणी पद्धतीने आंतरधर्मीय लग्न केलं आहे. साराने लग्नाचे फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. परंतु आंतरधर्मीय लग्न केल्याने तिला ट्रोल केले जात आहे. मात्र ट्रोलर्सना आता साराने सडेतोड उत्तर दिलं आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत सारा म्हणाली, “आमच्या विवाहनोंदणीनंतर केलेल्या शुभेच्छांच्या आणि आशीर्वादांच्या वर्षावासाठी मी सर्वांचे खूप आभार मानते. क्रिश आणि माझी संस्कृती वेगवेगळी आहे, परंतु या दोन्ही संस्कृतींनी आम्हाला प्रेम शिकवलं आहे. आमच्या कुटुंबीयांनी सर्वांत आधी सर्वांचा आदर करण्यास शिकवलं आहे. त्याचसोबत कोणाला दुखवू नये, असंही त्यांनी आम्हाला शिकवलं आहे. आमचीसुद्धा मतं हीच आहेत. Sara Khan Trolled |
View this post on Instagram
कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा अपमान करण्यास शिकवत नाही
“इतरांचा आदर करा आणि जे आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञतेची भावना मनात ठेवा, हे आम्ही लहानपणापासूनच शिकलोय. त्यामुळे आमच्या लग्नाबद्दल नकारात्मक कमेंट्स करणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की, कृपया ही गोष्ट शिका की, कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा अपमान करण्यास किंवा तुच्छ लेखायला शिकवत नाही.” Sara Khan Trolled |
पुढे ती म्हणाली, “आम्ही आमच्या लग्नाचा आनंद सर्वांसोबत शेअर करतोय, त्यासाठी कोणाचीही परवानगी मागत नाही आहोत. आमचे कुटुंबीय आणि कायदा यांची परवानगी आम्हाला मिळाली आहे. माझ्या आणि माझ्या देवाच्या मधे येण्याचा अधिकार कोणालाच नाही. माझ्या देवाने मला फक्त प्रेम करायला शिकवलंय आणि मी फक्त तेच करणार आहे. कोणताच धर्म तुम्हाला वाईट गोष्टी बोलायला शिकवत नाही किंवा कोणताही धर्म तुम्हाला दुसऱ्या आयुष्यात शिरून त्यावर मतं मांडायला शिकवत नाही.”
डिसेंबर महिन्यात दोन्ही पद्धतीने लग्नगाठ बांधणार
“जर तुम्ही धर्मावर इतकं प्रेम करता, तर इतरांवरही फक्त प्रेम करा. माझ्यामुळे वाईट गोष्टी बोलून तुम्ही स्वत:लाच का गुन्हेगार बनवत आहात? आम्ही एकमेकांच्या धर्माचा आणि संस्कृतीचा आदर करत दोन्ही पद्धतीने लग्न करणार आहोत. निकाह आणि पहाडी लग्न विधीवत पार पडणार आहेत,” असंही ती म्हणाली. दरम्यान, डिसेंबर महिन्यात हे दोघं निकाह आणि हिंदू पद्धतीनेही लग्नगाठ बांधणार आहेत.
सारा खानने 2010 मध्ये तिने अभिनेता अली मर्चंटशी ‘बिग बॉस’च्या घरात लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या अवघ्या वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर आता तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. Sara Khan Trolled |
हेही वाचा:
सोने स्वस्त झाले की महाग? ; वाचा आज १० ग्रॅम सोन्याची किंमत किती ?





