Sara Khan : टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम सारा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री तिच्या लेटेस्ट पोस्ट्सद्वारे तिच्या चाहत्यांना अपडेट करत असते. ती बऱ्याच दिवसांपासून शंतनू राजेला डेट करत होती. दोघेही गेली चार वर्षे एकत्र होते. दोघांनीही त्यांच्या नात्याला एक पाऊल पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही लवकरच लग्न करणार होते. मात्र अचानक त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. सारानं सोशल मीडियावर केलेल्या त्या पोस्टनं सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आहे. त्यातून तिनं तिच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासाही केला आहे. साराने शंतनूसोबतच्या ब्रेकअपची घोषणा केली आहे. सारा खान आणि शंतनू लग्नाच्या काही दिवसांपूर्वी वेगळे झाले आहेत. दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाल्याचे अभिनेत्रीने पोस्टद्वारे सांगितले आहे. सारा खानने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, “मी आणि माझ्या जोडीदाराने परस्पर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे आपण दोघेही आपल्या आयुष्यात एकटेच पुढे जाऊ. पण तरीही आम्ही दोघे एकमेकांचा आदर करतो. तेव्हा कृपया तुम्हीही आमच्या गोपनीयतेची काळजी घ्या. माझा मुद्दा समजून घेतल्याबद्दल धन्यवाद…” या पोस्टमध्ये सारा खानने तिचे आणि शंतनूच्या ब्रेकअपचे कारण सांगितलेले नाही. शंतनू एक पायलट असून सारा गेल्या 4 वर्षांपासून डेट करत होती. एका मुलाखतीदरम्यान तिने लवकरच शंतनूसोबत लग्न करणार असल्याचेही सांगितले होते. दरम्यान, सारा ही बिग बॉस 4 मध्ये दिसली होती. त्यात तिचं अली मर्चंटवर प्रेम जडलं होतं. त्यांनी बिग बॉसमध्येच लग्नही केलं होतं. त्याची खूप चर्चाही झाली होती. मात्र त्या शो मधून बाहेर आल्यावर त्यांचं लग्न मोडलं आणि ते वेगळे झाले होते.