अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा,व्हेंटिलेटर सपोर्टही निघू शकतो ! रुग्णालयाने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Updated On:

पुणे – अभिनेता विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. आज दीनानानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीमध्ये आश्वासक सुधारणा होत असल्याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. त्यासोबत ते डोळे उघडत असून हात पाय हलवत आहेत अशी माहिती याडगीकर यांनी दिली. तसेच पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघू शकेल असे वाटत असून त्यांचा रक्तदाब व ह्रदयाची क्रिया स्थिर आहे अशी महत्वाची अपडेट आज सकाळी रुग्णालयाकडून देण्यात आली.

पत्नीने दिली होती महत्वाची माहिती
काल माध्यमांना माहिती देताना विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी सांगितले होते की,’बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि ते कोमात गेले. त्यांचे विविध अवयवांनी काम करणे बंद केले आहे. अफवांना बळी पडू नका. डॉक्टर प्रयत्न करत आहे.’ असं वृषाली गोखले म्हणाल्या होत्या.

आणखी संबंधित बातम्या

Suresh Kalmadi : बातमी पुण्यातून! सुरेश कलमाडींची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; शरद पवारांनी घेतली भेट

2025-09-17 12:40:41

Suresh Kalmadi : बातमी पुण्यातून! सुरेश कलमाडींची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; शरद पवारांनी घेतली भेट

तनिषा भिसे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तिसऱ्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर

2025-04-12 11:12:32

तनिषा भिसे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तिसऱ्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर

तनिषा भिसे मृत्यूप्रकरण: डॅा. सुश्रुत घैेसास यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने बजावली नोटीस

2025-04-12 08:09:47

तनिषा भिसे मृत्यूप्रकरण: डॅा. सुश्रुत घैेसास यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने बजावली नोटीस

Pune : दीनानाथच्या परिसरात आंदोलन करण्यास बंदी

2025-04-10 05:22:49

Pune : दीनानाथच्या परिसरात आंदोलन करण्यास बंदी

Pune : तनिषा भिसे यांच्या मृत्यूची ‘माता मृत्यू’ अशी नोंद

2025-04-09 13:24:28

Pune : तनिषा भिसे यांच्या मृत्यूची ‘माता मृत्यू’ अशी नोंद