इमरान हाश्मीसोबत झळकणार मराठमोळी अभिनेत्री; वेब सीरिजमध्ये दिसणार नव्या अंदाजात

Emraan Hashmi | बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ नावाच्या वेब सीरिजमध्ये तो पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर त्याच्यासोबत झळकणार आहे.
‘तस्करी’ वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यात बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळणार आहे. सीरिजमध्ये झोया अफरोज, फ्रेड्डी दारुवाला, अनुजा साठे, नंदिश सिंग संधू आणि शरद केळकर हे कलाकार झळकणार आहेत.
“तस्करीच्या दुनियेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे,” असं म्हणत अमृताने टीझर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिचा लूक प्रभावी दिसत असून, ती एका वेगळ्याच अवतारात दिसणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. मात्र ‘तस्करी’मध्ये अमृता नेमकी कोणती भूमिका साकारणार, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. Emraan Hashmi |
View this post on Instagram
इमरान हाश्मीसोबत यापूर्वी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटात काम केले होते. आता अमृता त्याच्यासोबत दिसणार असल्याने चाहते देखील वेबसिरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘तस्करी’ वेब सीरिजचे दिग्दर्शक नीरज पांडे आहेत. Emraan Hashmi |
नव्या वर्षात रंगभूमीवर पदार्पण
काही दिवसांपूर्वी अमृता खानविलकरने चाहत्यांना नव्या वर्षात रंगभूमीवर पदार्पण करणार असल्याचे सांगितले होते. ती पहिल्यांदाच नाटकात काम करणार आहे. तिच्या या नाटकाचे नाव ‘लग्न पंचमी’ असून ती अभिनेता स्वप्नील जोशीसोबत झळकणार आहे. त्यामुळे एकंदरीतच अमृताने २०२५ वर्षाच्या शेवटी चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. Emraan Hashmi |
हेही वाचा:
दाट धुक्यामुळे यमुना एक्सप्रेसवेवर ८ बस आणि ३ कारची टक्कर ; अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू, २५ जण जखमी





