जिनिलीया आणि इमरान एकत्र; ‘गनमास्टर G9’ चा टीझर रिलीज

Gunmaaster G9 | बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘गनमास्टर जी९’ असे या चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री जिनिलीया देशमुख देखील झळकणार आहे. यांच्यासोबत चित्रपटात अपारशक्ती खुराना देखील दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले आहे.
चित्रपटाचा निर्माता दिपक मुकुट यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर धमाकेदार टीझर शेअर केला आहे. सोबतच “दूध से बारूद, सब्जी से गुंडा, गोलियों से मारना है, गनमास्टर जी9 तबाही के लिए तैयार हो रहा है, और टीम तैयार, लोडेड और घातक है!”, असे या टीझरला हटके कॅप्शन दिले आहे.
‘गनमास्टर जी९’ चित्रपटाचा टीझर तीन भागांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. पहिल्या भागात तो हातात बंदूक घेऊन दुधाने भरलेल्या बादली मधून त्याचा हात बाहेर काढताना दिसत आहे. त्याच्या हातात रूद्राक्षाची माळ, हातावर शिवलिंग आणि नंदीबैलाचा टॅटू दिसत आहे. Gunmaaster G9 |
View this post on Instagram
टीझरच्या दुसऱ्या भागामध्ये जिनिलीया देशमुख बांगड्यांनी भरलेल्या हातात सूरा घेऊन दुधाच्या बादलीमधून हात बाहेर काढत म्हणते की, “घर की बहू हूं, इसका ये मतलब नहीं कि सिर्फ निर्मल और शीतल हूं… घर पर सब्जी आएगी तो सब्जी काटुंगी लेकिन अगर घर पर गुंडे-बदमाश आए तो, सब्जी थोड़ी काटूंगी.” Gunmaaster G9 |
टीझरच्या तिसऱ्या भागामध्ये अपारशक्ती खुरानाचा हात पाहायला मिळत आहे. तो म्हणतो की, “लोहे की कांटी, दे सुराठी. हाथ में है बम. गुड़गांव में लोग हमसे 70 फीट दूर रहते हैं… क्योंकि बम और हम कभी भी फट सकते हैं.” असं म्हणत हातात बॉम्ब घेऊन दुधाने भरलेल्या बादली मधून त्याचा हात बाहेर येताना दिसत आहे. ‘गनमास्टर जी९’ चित्रपट नवीन वर्षात 2026ला रिलीज होणार आहे. Gunmaaster G9 |
हेही वाचा:
Social Media : मृत्यूनंतर सोशल मीडियाचे काय? आता फेसबुक, इन्स्टाग्रामसाठीही ठरवा ‘डिजिटल वारस’!





