सत्य घटनेपासून प्रेरित ‘हक’चा टीझर प्रदर्शित; इमराम हाशमी पहिल्यांदाच वकिलाच्या भूमिकेत

Haq movie teaser : आता बॅालिवूड इंडस्ट्रीतही प्रयोगात्मक सिनेमे यायला सुरूवात झाली आहे. अभिनेता इमरान हाशमी आणि अभिनेत्री यामी गौतम यांचा ‘हक‘ हा सिनेमा त्यापैकी एक आहे. नुकताच सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. हक सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. एका महिलेला तिचा पती देत असलेला त्रास, त्यातून न्याय मिळवण्यासाठी तिची सुरू असलेली धडपड. याचं विचार करायला लावणार चित्रण टीझरमध्ये दिसत आहे.
या महिलेला रोल अभिनेत्री यामी गौतमने साकारलेली आहे. तर अभिनेता इमरान हाशमी हा वकिलाच्या भूमिकेत आहे. या सिनेमाची कथा ही १९८० च्या दशकात बातम्यांमध्ये स्थान मिळवणाऱ्या मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाह बानू बेगम या खटल्यात देण्यात आलेल्या निकालापासून प्रेरित आहे. ही महिला आपल्या हक्काबांबत बोलताना दिसत आहे. त्या हक्कांसाठी तिच्यावर न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची वेळ येते.
View this post on Instagram
टीझरमध्ये इमरान हाशमी यामी गौतमीला म्हणतो, जर तू खरी मुस्लिम असती आणि चांगली आणि निष्ठावान पत्नी असती तर तू कधीही असं बोलली नसतीस. यावर यामीने दिलेलं उत्तर बरचं काही सांगून जातं. मी फक्त शाजिया बानो आहे आणि माझी लढाई एकाच गोष्टीसाठी आहे, माझा अधिकार!
हक सिनेमाचा टीझर पाहून उत्सुकता वाढलेली आहे. या सिनेमात इमरान हाशमी पहिल्यांदाच वकिलाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा ७ नोव्हेंबर २०२५ रोजी थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सुप्रेन वर्मा यांनी केलं आहे. तर या सिनेमाचे निर्माते विनित जैन हे आहेत.
हेही वाचा : ‘सध्याच्या राजकारणातील कोहिनूर’; मनसेकडून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या कार्याचे कौतुक





