Emraan Hashmi : इमरान हाशमीला डेंग्यू! प्रकृती बिघडल्याने थेट रुग्णालयात केले दाखल

Emraan Hashmi infected with dengue : बॅालीवूडमधील अभिनेता इमरान हाशमीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या चित्रपटांना काळी काळापासून फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. तरी देखील त्याचे फॅन फॅालोविंग जबरदस्त आहेत. नुकताच त्याचा ग्राउंड झिरो नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर फ्लॅाप ठरला. आता इम्रान त्याच्या आगामी एका चित्रपटाची शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला डेंग्यूची लागण झाली असल्याची बातमी समोर आली आहे.
याविषयी वीरल भयानी यांनी एक पोस्ट इन्स्टावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बॉलीवूडचा स्टार अभिनेता इमरान हाशमी याला डेंग्यू झालेला आहे. तो पावर स्टार पवन कल्याणसोबत ‘ओजी’ चित्रपटाची शुटिंग करत होता. गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये ही शुटिंग सुरू होती. परंतु, त्याला डेंग्यूची लक्षणं जाणवू लागली. त्यामुळे आता त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. आजारी असल्याने काही काळ या त्याने शूटिंगमधून त्याने ब्रेक घेतला आहे, असे पोस्टमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
‘ओजी’ नावाच्या चित्रपटातून अभिनेता इमरान हाशमी आणि दाक्षिणात्य अभिनेता पवर कल्याण एकत्र पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रियंका मोहन ही देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. इमराने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आवारापन २ ची घोषणा केली होती. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





