पवन कल्याण आणि इमरान हाश्मीच्या चित्रपटाने ओलांडला 100 कोटींचा टप्पा

OG Box Office | साऊथ सुपरस्टार आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण व अभिनेता इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दे कॉल हिम ओजी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ६३ कोटींचा टप्पा पार केला होता.
‘ओजी’ने आतापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर 122 कोटी रुपये कमावले आहेत. कमी वेळात 100 कोटींचा आकडा पार करणारा हा पवन कल्याणचा विक्रमी चित्रपट ठरला आहे. ‘ओजी’ हा एक गँगस्टर ड्रामा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी खलनायकाच्या भूमिकेत अप्रतिम दिसला आहे.
पवन कल्याण आणि इमरान हाशमी यांच्यासोबतच प्रियंका अरुलमोहन, श्रीया रेड्डी, प्रकाश राज, अर्जुन दास यांसारखे प्रसिद्ध दक्षिण अभिनेते या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. OG Box Office |
पवन कल्याणचा शेवटचा चित्रपट असण्याची शक्यता
प्रदर्शित होताच या चित्रपटाने प्रचंड चर्चा निर्माण केली, कारण हा चित्रपट पवन कल्याणचा शेवटचा चित्रपट असण्याची अपेक्षा आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री असलेले हे अभिनेता राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटांपासून दूर जाणार आहेत.
चित्रपटाच्या रिलीजसोबतच अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत. सोशल मीडियावर ‘ओजी’बद्दल जबरदस्त चर्चा रंगली असून सिनेमागृहात या चित्रपटासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. पवन कल्याण आणि इमरान हाश्मी यांची जोडी, अॅक्शन सीन, दमदार डायलॉग्ज आणि कथानकामुळे चित्रपटाने केवळ साऊथमध्येच नाही तर संपूर्ण भारतात आपली छाप सोडली आहे. OG Box Office |
सुजीत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे आणि या चित्रपटाने आपल्या बजेटच्या निम्मा हिस्सा आधीच जमा केला आहे.
हेही वाचा:
“सरकार तुमचयं ना आम्हाला काय…”; संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर कडाडले थेट म्हणाले “भो****”





