अभिनेते अमोल बावडेकरांना हार्ट अॅटक; ‘सुंदर मी होणार’ नाटकाच्या प्रयोगाआधी नेमकं काय घडलं?

Actor Amol Bawdekar : रविवारी सकाळी मुंबईतील विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात ‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला. या नाटकात महत्वाची भूमिका साकारणारे अभिनेते अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे नाटकाचा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय नाटकाच्या निर्मात्यांनी घेतला.
शनिवारी बावडेकर यांनी वाशीमध्ये नाटकाचा प्रयोग केला. त्यानंतर त्यांना रविवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेते अमोल बावडेकर यांच्यावर अँलिओग्राफी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले आहे. मात्र, प्रकृती ठीक नसतानाही प्रयोग करू देण्याची बावडेकर यांची विनंती ही कलेप्रिती असलेले प्रेम अधोरिखित करत आहे.
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
‘सुंदर मी होणार’ या नाटकाला रंगभूमीवर चांगला प्रतिसाद मिळत असून या नाटकाचे विविध ठिकाणी प्रयोग झाले आहेत. शनिवारी या नाटकाचा प्रयोग वाशीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. अभिनेते अमोल बावडेकर यांना अस्वस्थ वाटत होते, तरीही त्यांनी नाटकाचा प्रयोग पूर्ण केला. यानंतर लगेचच जोडून दुसऱ्या दिवशी रविवारी पार्ल्यातील दीनानाथ नाट्यगृहात सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला. अभिनेते अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अमोल बावडेकर यांच्यावर अँलिओग्राफी करण्यात आली आहे. निमार्त्यांनी रविवारीच्या प्रयोगाचे प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे केले आहेत. आता या नाटकात अमोल यांच्या जागी अभिनेता अनिरुद्ध जोशी ही भूमिका साकारणार आहे, अशी माहिती नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी दिली.





