Tejashree Pradhan : मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसल्याने अभिनेत्री तेजश्री प्रधानने व्यक्त केली खंत

अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधानचा ‘हॅशटॅग तदैव लग्नम्’ हा चित्रपट २० डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. यादरम्यान या चित्रपटामधील मुख्य अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने महाराष्ट्रात मराठी सिनेमांना थिएटर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही खदखद व्यक्त केली.
तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हंटले कि “पुणे आणि मुंबईमध्ये (मिळालेल्या काही मोजक्या सिनेमागृहांमध्ये) हॅशटॅग तदैव लग्नम् हा आमचा चित्रपट हाऊसफुल चालू आहे. पण महाराष्ट्रात मराठी सिनेमासाठी थिएटर उपलब्ध नाहीत हे दुर्दैवी आहे,” असे परखड मत व्यक्त करत तिने आपली खदखद व्यक्त केली आहे. तिने हि खंत बोलून दाखवल्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास हॅशटॅग तदैव लग्नम् या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले आहे. तर तेजश्री प्रधान, सुबोध भावे, प्रदीव वेलणकर, मानसी मागीकर, शर्मिष्ठा राऊत हे दिग्ग्ज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात लग्न करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरुण-तरुणींची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
चित्रपटाला प्रेक्षकांची पसंदी
हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाच्या कलाकारांची पाठ थोपटली आहे. सर्वांची उत्तम अभिनय केला असून या चित्रपटाची कथादेखील चांगली आहे अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे.





