अभिषेक बच्चनच्या महिलेने लगावली कानशिलात; म्हणाली ‘वडिलांच्या कामाचा अपमान…’

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनने अनेक चित्रपटात काम केले आहे. अभिषेक बच्चनने यापूर्वी ऍक्शन आणि रोमॅंटिक हिरोचे रोल साकारले आहेत. मात्र काही चित्रपटांमुळे त्याला मोठ्या प्रमाणात टिकेचा सामना करावा लागला. वडिलांप्रमाणे त्याला बॉलीवूडमध्ये म्हणावे तितके यश मिळाले नाही. नुकतेच त्याने एका मुलाखतीमध्ये 2002मध्ये ‘शरारत’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर घडलेला प्रसंग सांगितला आहे.
अभिषेकच्या एका महिला प्रेक्षकानं थिएटरच्या बाहेर कानशिलात लगावली होती. याबाबत त्याने मुलाखतीत सांगितले की, “त्या महिलेला सिनेमा आवडला नव्हता. त्यामुळं तिनं थेट मला पाहिल्यानंतर एक कानशिलात लगावली होती. इतकंच नाही तर, त्या महिलेनं मला तू अभिनय करणं सोडून दे. असा अभिनय करून तू तुझ्या वडिलांच्या कामाचा अपमान करत आहेत,” असं ती अभिषेकला म्हणाली होती.
मात्र याच थिएटरमध्ये त्याचे हजारो लोकांनी स्वागत केल्याचेही त्याने सांगितले. “2012 मध्ये ‘बोल बच्चन’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिषेक पुन्हा त्याच थिएटरमध्ये गेला. तेव्हा हजारो लोक तिथं आले होते. खरं तर हे अजब आहे, तेव्हा मला आयुष्याचं एक चक्र पूर्ण झाल्यासारखं वाटलं,” असंही अभिषेक म्हणाला.
अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी त्याचा ‘दसवीं’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात यामी गौतम त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. तर लवकरच तो तमिळ क्राइम थ्रिलर ‘ओथथा सेरुप्पु’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या ‘इन टू द शॅडोज’ या वेबसिरीजमध्ये दिसला होता. ‘गुरु’, ‘युवा’, ‘कभी अलविदा ना कहना’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.





