Dongrale Crime : अखेर चिमुकलीला न्याय! डोंगराळेअत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीला फाशी
Dongrale Crime : नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे.

Dongrale Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात मालेगावच्या जलदगती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. या घटनेच्या दहा महिन्यानंतर मालेगावच्या अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. (Dongrale Crime)
16 नोव्हेंबर 2015 रोजी डोंगराळे गावात साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी मालेगावमध्ये बंद आणि निषेध मोर्चेही काढण्यात आले होते. (Dongrale Crime)
या प्रकरणाचा तपास मालेगाव तालुका पोलिसांनी केला. पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या 23 दिवसांत 425 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. तपास आणि खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने एकूण 24 साक्षीदार तपासले. (Dongrale Crime)
या खटल्यात राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने वैद्यकीय, न्यायवैद्यक आणि डीएनए पुराव्यांसह साक्षीदारांच्या जबाबांचा आधार घेतला. (Dongrale Crime)
30 सप्टेंबर रोजी न्यायालयाने आरोपी विजय खैरनार याला दोषी ठरवले होते. त्यानंतर शिक्षेचे स्वरूप निश्चित करण्यासाठी न्यायालयाने आरोपीची कौटुंबिक पार्श्वभूमी, कारागृहातील वर्तन आणि मानसोपचारतज्ज्ञांचा अहवाल यांसारख्या बाबींचा विचार केला. सरकारी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. (Dongrale Crime)
मालेगावच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा मानले आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे. या निकालामुळे पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. (Dongrale Crime)





