आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी; रक्त आणि केसांचे नमुने फोरेन्सिक लॅबला पाठवले

Swargate Bus Depot Case | पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी (ता. 25) बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर सर्व स्तरातून घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (वय ३६) याला पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे. त्याला दि. २८ फेब्रुवारीला शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी गाडेने तरुणीकडे वाहक असल्याचं भासवत तरूणीला शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगितलं. त्यानंतर तिच्या मागे जाऊन तिला अडवलं आणि तिच्यावर अत्याचार केला अशी माहिती या घटनेनंतर समोर आली होती. मात्र, या घटनेनंतर अनेक धक्कादायक दावे केले जात आहेत. त्याचबरोबर हा अत्याचार नसून दोघांच्याही समंतीने संबंध प्रस्थापित झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर फरार झालेल्या दत्ता गाडेला 70 तासांनंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची ससून रुग्णालयात त्याची पहिली वैद्यकीय तपासणी तसेच लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. लैंगिक क्षमता चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यानंतर आता गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. याशिवाय आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस फोरेन्सिक लॅबला पाठवले आहेत.
बसची प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी पाहणी
स्वारगेट बसस्थानकात ज्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला, त्या बसची न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी पाहणी केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. आरोपीविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत. बसची फॉरेन्सिक चाचमी त्यात पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. ससून रुग्णालयात आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली ती पण पॉझिटिव्ह आली आहे.
गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
तरुणीवर अत्याचार करुन गाडे फरार झाला होता. शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री त्याला स्थानिकांच्या मदतीने अटक केली आहे. गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. Swargate Bus Depot Case |
पैशांचा व्यवहार झाल्याचा दावा
दुसरीकडे या प्रकरणात पैशांचा व्यवहार झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. आरोपीच्या वकीलांनी दत्ता गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यापासून ओळखतात. त्यांचे कॉल रेकॉर्डस काढले तर समजेल. बसमधून दोघे एकत्रच उतरले. बसमधून उतरुन दोघे कुठे गेले याची माहिती घेण्यात यावी, असे आरोपी दत्ता गाडेच्या वकीलांनी सांगितले. Swargate Bus Depot Case |
हेही वाचा :
सॅमसंग ते मोटोरोला… 7 हजारांच्या बजेटमधील ‘हे’ आहेत सर्वोत्तम स्मार्टफोन्स, पाहा डिटेल्स





