पुणे : शिवणे गावातील गोळीबारातील आरोपी जेरबंद
Updated On:

पुणे –शिवणे गावात चारचाकी वाहनाचा पाठलाग करुन तरुणावर गोळीबार करणाऱ्यास अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने केली आहे.
कार्तिक संजय इंगवले (18, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी शिवणे गावामध्ये गोळीबार करून फरार झालेला सराईत गुन्हेगार नीलेश गायकवाड याच्या टोळीतील कार्तिक इंगवले हा नाशिक फाटा येथे येणार आहे.
अशी माहिती पोलीस शिपाई ऋषिकेश ताकवणे व ऋषिकेश व्यवहारे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याचाकडे तपास केला असता, त्याने जुन्या वादातून दि.8 ऑगस्ट रोजी शिवणे येथे साथीदारसह केदार भालशंकर याच्यावार गोळीबार केल्याचे सांगितले.





