27 हजार 944 पोलिसांच्या विरोधातील खातेनिहाय कारवाई प्रलंबीत
Updated On:

नवी दिल्ली – देशाच्या विविध भागातील एकूण 27 हजार 944 पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधातील खातेनिहाय कारवाई प्रलंबीत आहे अशी माहिती ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च ऍन्ड डेव्हलमेंटच्यावतीने देण्यात आली आहे. खाते निहाय चौकशी किंवा कारवाई प्रलंबीत असलेल्या राज्यांपैकी बिहार, तेलंगणा आणि जम्मू काश्मीर या राज्यांतील प्रमाण सर्वाधिक आहे असेही दिसून आले आहे.
या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सन 2019 या वर्षात एकूण 53 हजार 675 पोलिसांवरील कारवाई प्रलंबीत होती. त्यातील 24 हजार 731 प्रकरणात कार्यवाही पुर्ण करण्यात आली असून अजून 27 हजार 944 प्रकरणातील कारवाई प्रलंबीत आहे. बिहार मध्ये सर्वाधिक म्हणजे 4655 प्रकरणे प्रलंबित आहेत. तेलंगणात 2475, जम्मू काश्मीर मध्ये 2153, ओडिशात 1952, उत्तरप्रदेशात 1695 प्रकरणे प्रलंबीत आहेत.





