Karad News : कराड- ढेबेवाडी मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू
कराड- ढेबेवाडी मार्गावर कुसूर (ता. कराड) गावच्या हद्दीत (Karad News) शनिवारी सकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला.

Karad News : कराड- ढेबेवाडी मार्गावर कुसूर (ता. कराड) गावच्या हद्दीत (Karad News) शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळून झालेल्या भीषण अपघातात कमलेशकुमार सिबार कोल (वय २५, मूळ रा. उपरवली, ता. सिधी, जि. सिलावर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कमलेशकुमार शनिवारी सकाळी कामानिमित्त दुचाकीवरून तळमावले येथून कोळेच्या दिशेने निघाला होता. सकाळी ८.२० च्या सुमारास तो कुसूर गावच्या हद्दीत आला असता भरधाव दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीने रस्त्याच्या दुभाजकाला (Karad News) जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, या अपघातात त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.






