Accident News : भीषण अपघात..! भाजप नेत्याच्या कारची स्कुटीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू
Accident News : शनिवारी झालेल्या भीषण अपघातात स्कुटीवरून प्रवास करणाऱ्या दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला.

Accident News : बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात शनिवारी झालेल्या भीषण अपघातात स्कुटीवरून प्रवास करणाऱ्या दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या फॉर्च्युनर कारने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या प्रकरणात अपघातग्रस्त कार भाजप नेत्या नूतन गुप्ता यांच्या नावावर नोंद असल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Accident News)
ही दुर्घटना बोचहान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिगोपालपूर चौकाजवळ घडली. धडक इतकी जबरदस्त होती की स्कुटीचा अक्षरशः चुराडा झाला, तर फॉर्च्युनर नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांमध्ये जाऊन घुसली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. (Accident News)
या अपघातात नेहा कुमारी (वय २३) आणि निशू कुमारी (वय २३) यांचा मृत्यू झाला. नेहा ही आदिगोपालपूर येथील रहिवासी राजू चौधरी यांची मुलगी होती, तर निशू ही सरफुद्दीनपूर येथील सोहन चौधरी यांची मुलगी होती. दोघींना एसकेएमसीएच रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Accident News)
दरम्यान, अपघातग्रस्त फॉर्च्युनर पूर्णिया येथील भाजप नेत्या नूतन गुप्ता यांच्या नावावर असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, अपघाताच्या वेळी कार कोण चालवत होते, वाहनात नेमके कोण होते आणि अपघातानंतर ते घटनास्थळावरून कसे निघून गेले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Accident News)
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा कारमध्ये कोणीही नव्हते. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने झुडपात अडकलेली फॉर्च्युनर बाहेर काढण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी आणि अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. मृत तरुणींच्या कुटुंबीयांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Accident News)
Accident News : मुंबई-वडोदा महामार्गावर भीषण अपघात; दुर्घटनेत फुटबॉलपटू आणि तरुणीचा मृत्यू
Accident News : महाराष्ट्र हादरला..! पिकअप-दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा अंत





