ACB Trap : मोठी बातमी..! ‘समाजभूषण’ पुरस्कारप्राप्त विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहात अटक
ACB Trap : राज्यात लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुलढाणा जिल्ह्यात एक मोठी आणि खळबळजनक कारवाई केली आहे.

ACB Trap : राज्यात लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) सातत्याने धडक कारवाया करत असून, बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. जळगाव जामोद पंचायत समितीतील विस्तार गट विकास अधिकारी संदीप मोरे याला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात अटक केली आहे. (ACB Trap)
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील एका शेतकऱ्याचे शासकीय काम करून देण्यासाठी संदीप मोरे याने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यामध्ये मोरे लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला. (ACB Trap)
विशेष म्हणजे, संदीप मोरे यांना यापूर्वी विविध सामाजिक कार्यासाठी ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मात्र, लाच स्वीकारताना अटक झाल्याने त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (ACB Trap)
दरम्यान, राज्यात गेल्या काही महिन्यांत एसीबीने शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांवर कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सहाय्यक निबंधक सूरज जगदाळे आणि सहकार अधिकारी सतीश शेरखाने यांनाही १३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. (ACB Trap)
सतत होत असलेल्या या कारवायांमुळे सरकारी यंत्रणेत लाचखोरीविरोधात एसीबीने कडक भूमिका घेतल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. (ACB Trap)
Vaibhav Naik : ठाकरे गटाचा बडा नेता ACBच्या रडारवर; काय आहे प्रकरण जाणून घ्या…





