Political News : मोठी बातमी.! माजी मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली, धाकटा मुलगा दौरे रद्द करून तातडीने भेटीसाठी दाखल
Political News : माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

Political News : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वास्थ्याची माहिती मिळताच त्यांचे मोठे पुत्र आणि जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेज प्रताप यादव तातडीने त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. या घडामोडींमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Political News)
पाटणा येथील 10 सर्क्युलर रोडवरील निवासस्थानी तेज प्रताप यादव यांनी राबडी देवी यांची भेट घेतली. बराच वेळ कुटुंबीयांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राबडी देवी यांची प्रकृती सध्या ठीक नसल्याचे सांगितले. (Political News)
दरम्यान, लालू प्रसाद यादव कुटुंबाने सरकारकडून देण्यात आलेली सुरक्षा परत केल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र तेज प्रताप यादव यांनी हे वृत्त फेटाळून लावले. “सुरक्षा कोणीही परत केलेली नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संपर्काबाबत काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. माताजींनी कोणतीही सुरक्षा नाकारलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. (Political News)
अलीकडेच बिहार सरकारने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांची ‘झेड प्लस’ सुरक्षा काढून त्याऐवजी बिहार पोलिसांची विशेष सुरक्षा व्यवस्था लागू केली होती. तसेच तेज प्रताप यादव यांच्या सुरक्षा व्यवस्थेतही कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Political News)
राबडी देवी यांच्या प्रकृतीबाबत राष्ट्रीय जनता दलाकडून अद्याप अधिकृत वैद्यकीय माहिती देण्यात आलेली नाही. त्या सध्या त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. (Political News)
तेज प्रताप यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, “माताजींची तब्येत ठीक नसल्याचे समजताच मी त्यांना भेटण्यासाठी आलो. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी आमची इच्छा आहे,” असे सांगितले. (Political News)





