Abhishek Ghosalkar Firing – भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच केलेल्या गोळीबाराची घटना ताजी आहे. अशातच आता गोळीबाराचे आणखी एक प्रकरण समोर आले असल्याने कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार हा पैशांच्या वादातून झाल्याचे समजते. ( Abhishek Ghosalkar Firing ) दहिसर येथे हा गोळीबार झाला असून मॉरिस नोरोऱ्हा असे गोळ्या झाडलेल्या इसमाचे नाव आहे. घोसाळकर यांच्यावर दहिसर येथील करुणा रुग्णालयामध्ये उपचार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घोसाळकर यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी भाजप आमदाराने मित्रपक्ष शिवसेनेच्या नेत्यावर गोळीबार केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण अद्याप ताजे असतानाच राजकीय नेत्यावर गोळीबार झाल्याची आणखी एक घटना समोर येत आहे. इतर महत्वाच्या बातम्या | Abhishek Ghosalkar Firing ठाकरेंचा आमदार शिंदेंकडे जाण्याची चर्चा; राऊतांनी, ‘त्या’ MLAचा फोटो शेअर करत… ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला? उद्धव यांना आधीच कल्पना? काँग्रेस का सोडली? दादांचं नेतृत्व स्वीकारणार? विचारताच बाबा सिद्दीकी स्पष्टच बोलले…