Sanjay Raut on Ravindra Waykar – शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. उद्धव ठाकरे यांचे समर्थक असलेले एक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असून त्यांच्यामध्ये गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हे आमदार ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील असल्याचं देखील बोललं जात आहे.
ही चर्चा सुरु असतानाच ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर राऊत यांनी, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ‘पक्षांतर करा, अथवा तुरुंगात जा’ अशी धमकी देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊत यांनी हा आरोप, ठाकरे गटाचा आमदार शिंदे गटात जाणार असल्याचे वृत्त समोर येत असतानाच केला आहे. यामुळे ‘तो’ आमदार वायकर तर नाहीत ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
संजय राऊत यांची पोस्ट? | Sanjay Raut on Ravindra Waykar
“शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे..येत्या काही दिवसात शिवसेना सोडा..पक्षांतर करा.. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे.हा एक प्रकारे दहशतवाद आहे.असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते.”
“रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत..ते लढतील व जिंकतील. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत.” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. | Sanjay Raut on Ravindra Waykar
इतर महत्वाच्या बातम्या
ठाकरेंचा आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला? उद्धव यांना आधीच कल्पना?
‘अजित पवार तुमच्या नादी लागून बिघडले…’; जितेंद्र आव्हाड यांचा धनंजय मुंडेंवर घणाघात