One more MLA to join Eknath Shinde – लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. असं असताना देखील विरोधकांची पडझड अद्याप थांबलेली नाही. काँग्रेसला नुकताच मुंबईमध्ये मोठा धक्का बसला असून पक्षाचे वरिष्ठ नेते बाबा सिद्दीकी बाहेर पडले आहेत.
काँग्रेसला बसलेला धक्का ताजा असतानाच आता महाविकास आघाडीतील आणखी एक प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ठाकरे गटातील एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत या आमदाराची गुप्त बैठकही झाल्याची माहिती समोर येत आहे.
लवकरच हा आमदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं नेतृत्व स्वीकारणार असल्याचेही समजते.
‘तो’ आमदार कोण?
उद्धव ठाकरे हे उद्या वायव्य मुंबई मतदारसंघात शाखा भेटीसाठी जाणार आहेत. शिंदेंसोबत जाणारा तो आमदार याच मतदारसंघातला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या दौऱ्यात तो आमदार उपस्थित राहणार का? अशीही चर्चा सुरु झाली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनेने याबाबत वृत्त दिले आहे.
१५ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन | One more MLA to join Eknath Shinde
१५ फेब्रुवारीला विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी मराठा आरक्षणाबाबत महत्वपूर्ण विधेयक आणणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वीच हा आमदार शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारणार असल्याचं बोललं जात आहे.
ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं – उद्धव ठाकरेंचे वक्तव्य
उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कोकण दौऱ्यावर एक वक्तव्य केलं होत. ‘जे सोडून गेले त्यांची फिकीर नाही, ज्यांना अजूनही जायचं आहे त्यांनी खुशाल जावं’ असं ते म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपले गटामध्ये असणारे काही लोक शिंदेंच्या संपर्कात असल्याची भनक आधीच लागली आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
भारत गोगावलेच व्हीप | One more MLA to join Eknath Shinde
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूचे आमदार पात्र ठरवले होते. मात्र शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा व शिंदे समर्थक भरत गोगावले हेच अधिकृत व्हीप यावरही त्यांनी शिक्कामोर्तब केले होते.
विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे गोगावले यांचा व्हीप, ठाकरे समर्थक आमदारांना देखील लागू होणार आहे. याचाच फायदा घेऊन शिंदे गटाकडून ठाकरे समर्थक आमदारांना आपल्या गटामध्ये घेण्यासाठी दबाव बनवला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
अशातच आता विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाचा एक आमदार शिंदेंच्या गाळाला लागला असल्याची माहिती समोर येत असल्याने पुढील काही दिवसांमध्ये राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असल्याची चिन्ह आहेत.