Abhishek Ghosalkar | ठाण्यातील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या फेसबुक लाइव्हदरम्यान झालेल्या हत्येचा तपास मुंबई पोलीस करत आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखेचे दोन पथके तयार केली. भाजप आमदाराने पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याचे प्रकरण ताजे असतांना पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. राज्यात दिवसेंदिवस क्राईम रेट वाढत आहे. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवरून विरोधीपक्षांनी राज्य सरकारवर आणि गृहमंत्र्यांवर चौफेर टीका केली आहे. अशात आता अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीये. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. यादरम्यान अचनाक मॉरिस याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. अशात त्या शेवटच्या सव्वाचार मिनिटांत नेमके काय घडले. पोलिसांच्या तपासातून हा सव्वा चार मिनिटांचा थरार समोर आला आहे. हेही वाचा : Abhishek Ghosalkar case : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी एकाला अटक ; फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिसनेच केला होता उल्लेख नेमकं काय घडलं शेवटच्या सव्वा चार मिनिटात फेसबुक लाइव्हदरम्यान अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नरोन्हा दोघेच कार्यालयात होते. मॉरिस याने ट्रायपॉड लावला. त्यानंतर त्याने फेसबुक लाइव्ह सुरू केले. फेसबुक लाईव्ह सुरु असताना दोन ते तीनदा मॉरिस उठून कॅमेऱ्याच्या बाजूला गेला. लाईव्ह सुमारे चार मिनिटे सुरु होते. त्यानंतर मॉरिस याने बंदुकीने पाच गोळ्या घोसाळकर यांच्या दिशेने झाडल्या. यापैकी चार गोळ्या त्यांना लागल्या. घटनास्थळी अचानक गोळ्यांच्या आवाज आला. यामुळे नागरिकांची पळापळ झाली. घोसाळकर खाली कोसळले. गोळीबारानंतर मॉरिस याने दरवाजाकडे धाव घेतली. बाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये मॉरिस दोन ते तीन सेकंद घोसाळकर यांना पाहताना दिसत आहे. त्यानंतर त्याच बंदुकीने मॉरिस स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बंदुकीतील गोळ्या संपल्याने तो पहिल्या मजल्यावर धावला. त्याठिकाणी पुन्हा बंदूक लोड केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सव्वाचार मिनिटांचा हा थरार पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे. हेही वाचा : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर शिंदे सरकारने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी घेतला मोठा निर्णय