अभिषेक बच्चनची सिल्वर स्क्रिनवर वापसी

बॉलीवूडमधील डायरेक्‍टर अनुराग कश्‍यप यांच्या “मनमर्जिया’मध्ये उत्कृष्ट परफॉर्मेंस दिल्यानंतर अभिनेता अभिषेक बच्चन पुन्हा एकदा सिल्वर स्क्रीनवर वापसी करण्याच्या तयारीत आहे. तो दिग्दर्शक कूकी गुलाटी यांच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत मुख्य नायिकेच्या भूमिकेत इलियाना डिक्रूज झळकणार आहे. याबाबत अभिषेकने सोशल मीडियावर माहिती दिली असून या चित्रपटाचे शूटिंगही सुरू करण्यात आले आहे.

याबाबत अभिषेकने क्‍लॅपबोर्डची एक इमेज शेअर करत माहिती दिली. या चित्रपटातून परत एकदा रोहित शेट्‌टीच्या “बोल बच्चन’नंतर अभिषेक आणि अजय देवगण सोबत काम करणार आहेत. या चित्रपटाला अजय देवगणची कंपनी प्रड्यूस करत असून हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्याचे समजते.

हा चित्रपट 1990 ते 2000पर्यंत भारतात असलेल्या आर्थिक परिस्थितीवर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक अजय देवगणला खूपच आवडल्याने तो चित्रपट प्रड्यूस करण्यास तातडीने तयार झाला.

दरम्यान, या चित्रपटात इलियानाची भूमिका खूपच निर्णायक असल्याचे बोलले जात आहे. पण ती अभिषेकच्या ऑपिझिट असणार नाअी. सध्या अभिषेकच्या ऑपोझिट भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रीचा शोध सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.