इंदापुर (प्रतिनिधी): इंदापूर शहरातील गणेश मंडळाच्या गणरायाची आरती इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै.अण्णासाहेब मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी शेकडो युवकांनी शहरातून रॅली काढली. इंदापूर शहरातील छत्रपती शिवाजी मित्र मंडळ खडकपुरा,सावता माळी मंडळ,कै बाळासाहेब शेलार प्रतिष्ठान,क्रांतिसिंह मित्र मंडळ,जय शंकर मित्र मंडळ, बाजारतळ मित्र मंडळ,महात्मा फुले मित्र मंडळ, सिद्धिविनायक मित्र मंडळ,महाकाल मित्र मंडळ,तेली गल्ली मित्र मंडळ गणेश मंडळ या गणेश मंडळाच्या वतीने दर वर्षी समाज प्रोबोधनाचे देखाव्यातुन जनजागृती केली जाते. इंदापूर शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न या गणेश मंडळाकडून केला जात आहे.या महत्त्वाच्या गणेश मंडळांची आरती मोठ्या उत्साहात व अण्णासाहेब मंजुळे यांच्या हस्ते पार पडली. इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठान मित्र परिवाराचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.