मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन’शी आराध्या बच्चनचे आहे खास नाते,ऐश्वर्याने सांगितलं सेटवरील किस्सा

मुंबई -मणिरत्नम यांचा चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात दक्षिणेतील अनेक मोठे कलाकार काम करत आहेत. यासोबतच मणिरत्नम यांची ऑल टाईम फेव्हरेट अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील या चित्रपटात दिसणार आहे.नुकतीच या चित्रपटासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यादरम्यान ऐश्वर्याने सांगितले की, आराध्या बच्चनचेही या चित्रपटाशी विशेष नाते आहे.
ऐश्वर्याने मणिसोबत 2010 मध्ये आलेल्या ‘रावण’ चित्रपटात काम केले होते. आता 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा ऐश्वर्या राय त्याच्यासोबत चित्रपट करत आहे. पत्रकार परिषदेदरम्यान ऐश्वर्या राय म्हणाली की, मणी सरांसोबत काम करणे हा एक वेगळा अनुभव आहे. त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना खास अनुभव देतात. या चित्रपटात ऐश्वर्या राय राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. जेव्हा ऐश्वर्याला विचारण्यात आले की आराध्याची तिच्या अभिनयाबाबतची प्रतिक्रिया कशी होती? यावर ऐश्वर्याने सांगितले की, ती खूप उत्साहित आहे. एकदा ती सेटवर आली तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती. त्याचबरोबर ती मणी सरांचा खूप आदर करते. आराध्याचा उत्साह पाहून मणी सरांनी तिला चित्रपटासाठीच्या शूटिंगदरम्यान ‘अॅक्शन’ बोलण्यास सांगितले होते.
View this post on Instagram
ऐश्वर्या राय बच्चन पुढे म्हणाली की जेव्हा मणी सरांनी आराध्याला ‘अॅक्शन’ बोलण्याची संधी दिली तेव्हा तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ‘अॅक्शन’ बोलल्याचं तिने मला मोठ्या उत्साहाने सांगितलं असल्याचे ऐश्वर्याने यावेळी सांगितलं. करोडोंचे बजेट असलेल्या या चित्रपटाचा पहिला भाग ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या स्टार्सनी त्याचे प्रमोशन सुरू केले आहे. विक्रम, त्रिशा, कार्ती, जयम रवी, जयराम, पार्थिवन, लाल, विक्रम प्रभू, प्रकाश राज यांच्यासह अनेक स्टार्स या चित्रपटात दिसणार आहेत.





