लेक आराध्याने घेतली ऐश्वर्याची ‘काळजी’

Bollywood । बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची लेक आराध्या ही बॉलीवूडची आवडती आई- लेकीची जोडी आहे. दोघींची जोडी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. जेव्हा जेव्हा आई आणि लेक एकत्र दिसतात तेव्हा त्यांच्याभोवती चर्चा सुरू होतात.
View this post on Instagram
आराध्या बच्चन इतर स्टार किड्सपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ती स्टार किड्सच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होत नाही, पण ती तिची आई ऐश्वर्यासोबत नेहमीच इव्हेंट्समध्ये उपस्थित राहते. ऐश्वर्या कुठेही गेली तरी तिच्या मुलीला सोबत घेऊन जाते. पुन्हा एकदा असेच घडले आहे, ती लेक आराध्यासोबत कान्स 2024 मध्ये पोहोचली. यावेळी आराध्याने जे काही केले त्यामुळे सध्या तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कान्सच्या रेड कार्पेटवरून ऐश्वर्या रायचे अनेक फोटो समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. समोर आलेल्या काही फोटोंमध्ये ऐश्वर्या रायची लेक आराध्याही दिसत आहे. ती आईची काळजी घेताना दिसत आहे. ऐश्वर्या राय तिच्या मुलीचा हात धरून पुढे जातांना दिसत आहे. ऐश्वर्याच्या एका हाताला दुःखापत झालेली दिसून येत आहे. अशावेळी आराध्य तिच्या आईला आधार देत आहे. या दरम्यानच्या फोटो आणि व्हिडिओवर आता चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहे.
दरम्यान, ऐश्वर्या रायने कान्सच्या रेड कार्पेटवर अनेक वेळा ग्रेस केले आहे आणि तिच्याप्रमाणेच कान्स तिच्या मुलीसाठीही काही नवीन नाही. आराध्याही आई ऐश्वर्या रायसोबत अनेकदा कान्सचा भाग झाली आहे.





