ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरीही कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी रवाना

Aishwarya Rai-Bachchan | बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या हाताला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलला १४ मे पासून सुरूवात झालेली आहे. यानिमित्त जगभरातील अनेक दिग्गज सेलिब्रिटी या फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावतात. ऐश्वर्या राय देखील दरवर्षी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होते. यावेळी देखील ती येथे उपस्थित राहण्यासाठी सज्ज झाली आहे. यानिमित्त बुधवारी संध्याकाळी ती तिची मुलगी आराध्यासोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. मात्र ऐश्वर्याच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याचं पहायला मिळालं.
व्हायरल व्हिडिओत ऐश्वर्याच्या हाताला पट्टी बांधली होती. मात्र दुखापतीविषयी ती काहीच बोलली नाही. परंतु सध्या ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाल्याचे पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, 2002 मध्ये सर्वांत पहिल्यांदा कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती.ऐश्वर्या गेल्या अनेक वर्षांपासून कान्स फेस्टिव्हलला उपस्थिती लावत आहे. दरवर्षी तिच्या लूकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू असते. गेल्यावर्षी अभिनेत्रीने रेड कार्पेटवर सिल्व्हर गाऊन कॅरी केला होता. Aishwarya Rai-Bachchan |
View this post on Instagram
जगातील सर्वात प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हल १४ मे पासून सुरू झाला आहे. यावेळी हा कार्यक्रम २५ मे २०२४ पर्यंत चालणार आहे. फ्रान्सच्या कान्स शहरात ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जगभरातील स्टार्स आपला स्टाइलिश लुक या दाखवतात. अनेकदा त्यांच्या हटके लुकचे सोशल मीडियावर नेटकरी कौतुक करतात. तर काही जण यावरून ट्रोलही होताना दिसतात. Aishwarya Rai-Bachchan |
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्यासह अदिती राव हैदरी, शोभिता धुलिपाला आणि कियारा अडवाणी हे सेलिब्रिटीसुद्धा सहभागी होणार आहेत. नुकतेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री दिप्ती साधवानी यांनीसुद्धा रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतले. त्यानंतर आता ऐश्वर्या चे चाहते देखील तिच्या लुकबद्दल उत्सुक आहेत.
हेही वाचा:
सोन चांदीचा भाव ‘उच्चांकावर’ जाणून घ्या तुमचा शहरातील आजचा ‘दर’





