ऐश्वर्याच्या लेकीने जिंकली चाहत्यांची मनं; ‘त्या’ कृतीमुळे केले कौतुक

Aaradhya Bachchan | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्यात काही तरी बिनसल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत आहे. दरम्यानच्या काळात दोघेही एकत्र पहायला मिळत नाहीत. मात्र ऐश्वर्यासोबत तिची लेक आराध्या नेहमीच दिसते.
नुकताच पार पडलेला दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्याने हजेरी लावली होती. यावेळी तिला मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी मुख्य अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
यादरम्यानचा ऐश्वर्या आणि आराध्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रम हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर ऐश्वर्याला मंचावरून खाली उतरण्यासाठी मदत करतो. मंचावरून खाली उतरल्यानंतर आराध्या तिच्या आईकडे धावत जाऊन मिठी मारते.
View this post on Instagram
त्यानंतर जेव्हा दोघी त्यांच्या जागेवर बसायला जातात, तेव्हा दाक्षिणात्य अभिनेता पुनीत राजकुमारचा भाऊ आणि कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमार ऐश्वर्याला शुभेच्छा देण्यासाठी येतात. ऐश्वर्याला शुभेच्छा दिल्यानंतर ती आराध्याची त्याच्याशी ओळख करून देते. तेव्हा आराध्यासुद्धा हात जोडून आधी त्यांना नमस्कार करते आणि त्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायांना स्पर्श करते. आराध्याचे संस्कार पाहून नेटकरीसुद्धा तिचं कौतुक करत आहेत. Aaradhya Bachchan |
दरम्यान, ऐश्वर्याने मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन’ आणि ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या दोन्ही चित्रपटात काम केले आहे.
हेही वाचा:
देवरा चित्रपटासाठी जान्हवी अन् सैफ अली खानला कास्ट करण्यामागचे ज्युनियर एनटीआरने सांगितले कारण





