कात्रज चौकात एसटी च्या चाकाखाली येऊन तरुणीचा जागीच मृत्यू
Updated On:

पुणे : कायमच रहदारीच्या गर्दीत सापडलेल्या कात्रज चौकामधील अपघात सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही, शनिवारी सव्वा आठच्या दरम्यान एसटीचा दुचाकीला धक्का लागला व चाका खाली येऊन एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
श्वेता चंद्रकांत लीमकर ( २५ मुळ रा.कोल्हापूर) असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.





