ग्रामसभा म्हटलं कि गावातील सर्व मोठ्या व्यक्तींचा त्यामध्ये सहभाग असतो मात्र गुंजवणे ग्रामपंचायत अंतर्गत घेण्यात आलेली ग्रामसभा एका अनोख्या उपक्रमामुळे प्रकाश झोतात आली आहे. यामध्ये नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. इतकाच नाहीतर गावातील विविध विकासकामे तसेच शालेय कामे यावर प्रभावीपणे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी सर्वानाच चकित केले. अशा प्रकारचा अनोखा उपक्रम राज्यात प्रथमच राबविण्यात आला असून सर्वांनी गुंजवणे ग्रामपंचयातीचे याबाबत विशेष कौतुक केले आहे. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक, ग्रामपंचायत मुख्याध्यापक परिसरात काम करणाऱ्या रेन्ट्री व प्रथमेश स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.