‘आईसाठी एक झाड’: ‘युनिक मेडिकल फाउंडेशन’ तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

पुणे : भांबुर्डा वनविभाग वेताळ टेकडी येथे ‘युनिक मेडिकल फाउंडेशन’ तर्फे ३ ऑगस्ट रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदा वनमोहस्थवाची थिम करण्यात आली होती.
‘आईसाठी एक झाड’ या अंतर्गत देशी व आयुवेर्दिक रोपांची लागवड करण्यात आली. ज्यात गुळवेल, अडूळसा, माका, कोरफड,पानफुटी, नागवेल, तुळस, सदाफुली,गवती चहा, पपई, आंबा, सोनटक्का, गुलमोहर, जांभूळ,फणस, वड, उंबर इ. रोपांचा समावेश होता.
कोरोना काळात ऑक्सिजनची किती आवश्यकता होती हे त्यावेळी प्रत्येकाच्या लक्षात आले. म्हणून प्रत्येकाने आईसाठी एक झाड लावावे व जगवावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले.यावेळी सुमारे ५० रोपे लावली, तसेच वृक्षारोपण करून ती झाडे जगवण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ सागर लोखंडे, उपाध्यक्ष सुभेदार मोहन शेलार, कार्याध्यक्ष डॉ.राहुल लोखंडे, खजिनदार मानसी लोखंडे, सचिव नारायण फणसे, सहकार्याध्यक्ष डॉ.सुप्रिया लोखंडे, डॉ.गणेश खाडे, विलास नेवसे, योगेश नेवसे, वासंती कोयाळीकर, केदार गोंजारी, शशिकांत लोखंडे,परक्षिती बटवाल, मंगल बटवाल, अर्जुन बटवाल, आंग्रे तसेच स्वरा, तनिष्का, जान्हवी लोखंडे यांनी सहभाग घेतला होता.





