Pune : पुण्यात खळबळ! कोल्ड कॉफीमधून मैत्रिणीला दिल गुंगीच औषध; ५ लाख किंमतीचे दागिने केले लंपास

Pune | पुण्यात कोल्ड कॉफीमधून मैत्रिणीला गुंगीच औषध देऊन पाच लाखांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मैत्रिणींनाच केलेल्या प्रकारामुळे पुण्यात हा विषय चर्चेचा ठरत आहे. गुंगीचे औषध देत ५ लाखांचे दागिने लंपास करण्यात आले आहे. ही घटना पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील विवा सोसायटीत घडली आहे. या प्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे.
दोघेही मैत्रीणी विवाहापूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यातील सदाशिव पेठेत रूममेट होत्या. काही कालावधीनंतर दोघींची लग्न झाली. आता दोघीही आंबेगाव बुद्रुक आणि आंबेगाव पठार परिसरात राहतात. ज्या मैत्रिणीने पाच लाखांचे दागिने चोरले. त्या मैत्रिणीला ऑनलाईन गेमिंगचा नाद असल्याचाही समोर आली आहे.
आपल्या मैत्रिणीसाठी कॉल कॉफी घेऊन तिच्या घरी गेली. त्यात गुंगीचं औषध मिसळलं आणि ते प्यायला नंतर दुसरी मैत्रीण बेशुद्ध पडली. त्यानंतर कपाटात ठेवलेले ५ लाख ४६ हजार रुपयांचे दागिने मैत्रिणींने लंपास केले. काही दिवसांनी घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसात धाव घेतल्यानंतर या संपूर्ण चोरीचा प्रकार उघडकीस आला.





