देशात करोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट; 24 तासांत 18 हजार बाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत करोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाल्याचे पाहायला मिळाले. देशात मागील 24 तासांत 18 हजार 257 नवीन करोना बाधितांची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसभरात 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जाहीर करत ही माहिती दिली आहे.
शनिवारी दिवसभरात 14 हजार 553 करोना रुग्णांनी विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. महामारी सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4 कोटी 29 लाख 68 हजार 533 रुग्णांनी करोना संसर्गावर मात केली आहे. देशव्यापी करोना लसीकरणात आतापर्यंत 198 हून अधिक करोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. मागील 24 तासांत 42 रुग्णांचा मृत्यू आहे. भारतात एकूण 5 लाख 25 हजार 428 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/kAxmSNwb3O pic.twitter.com/G5MEWRstVZ
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) July 10, 2022
शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी महाराष्ट्रातील करोनाची रुग्णसंख्या काहीशी कमी झाल्याचे दिसून आले आहे. राज्यात महाराष्ट्रातील 2760 नव्या रुग्णांची भर पडली असून 2934 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर, पाच करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईमध्ये मागील काही दिवसांत करोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. करोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. मुंबईत शनिवारी 499 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शनिवारी 811 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.





